Explore

Search

April 13, 2025 12:14 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

HSC Result 2024 : मुलांपेक्षा मुलीच ठरल्या अव्वल; जिल्ह्याचा निकाल 93.63, विज्ञान शाखेचा 99.11 टक्के निकाल

सातारा : बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी संकेतस्थळावर (Website) जाहीर झाला. बहुतांशी विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवरच पाहिला. नेट कॅफेत सुध्दा निकाल पाहण्यासाठी गर्दी नव्हती. सातारा जिल्ह्यातून 34 हजार 43 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यापैकी 33 हजार 789 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 31 हजार 637 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल 93.63 टक्के लागला आहे. तसेच पाच शाखेमध्ये विज्ञान शाखेचा 99.11 टक्के निकाल लागला आहे. पून:र्प्रविष्ठचा 50.32 टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे नेहमीसारखेच मुलांपेक्षा याही वर्षी मुलीच अव्वल आलेल्या आहेत.
बारावीसाठी परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या दरम्यान सातारा जिल्ह्यातील 259 कनिष्ठ महाविद्यालयातून 51 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. या परीक्षेकरता जिल्ह्यातून 34 हजार 43 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यापैकी 33 हजार 789 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 31 हजार 637 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल 93.63 टक्के लागला आहे. निकाल पाहण्यासाठी पूर्वीसारखे शाळेमध्ये वा नेट कॅफेत गर्दी झालेली नव्हती. दुपारी 1 वाजल्यापासूनच मुलांनी आणि पालकांनी आपल्या मोबाईलच्या नेटवरुन निकाल काही क्षणात पाहिला. सातारा शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, डी.जी. कॉलेज, छ. शिवाजी महाराज कॉलेज, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, कलावाणिज्य कॉलेज आदी कॉलेजेसमध्ये सायकांळी उशीरापर्यंत आपल्या कॉलेजमध्ये कोण पहिले आले, याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. कॉलेजकडून तसे सायंकाळी उशीरापर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते.
मुलीच ठरल्या अव्वल
अलिकडे कॉलेजमध्ये वा शाळेत अव्वल येण्याचे मुलींचे प्रमाण हे जास्त पहायला मिळते. याही वर्षी बारावीमध्ये मुलीच अव्वल आल्या असून सातारा जिल्ह्यात 17 हजार 876 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17 हजार 730 मुले प्रविष्ठ झाली होती. त्यापैकी 16 हजार 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 90.66 टक्के मुलांचा निकाल लागला, तर 16 हजार 167 मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 हजार 59 मुली प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी 15 हजार 562 मुली उर्त्तीण झाल्याने 96.90 टक्के निकाल लागला.

विज्ञान शाखा 99.11 टक्के
सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी हे विज्ञान शाखेचा अधिक पसंदी देत असतात. त्याच शाखेचा निकाल सुद्धा यावर्षी सर्वात चांगला लागला आहे. सातारा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 99.11 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेसाठी 18 हजार 318 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 18 हजार 274 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 18 हजार 113 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 99.11 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेसाठी 7 हजार 690 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 7 हजार 536 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 5 हजार 921 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 78.56 टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेसाठी 6 हजार 502 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 461 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 6 हजार 188 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 95.77% टक्के निकाल लागला. व्यावसायिक शाखेसाठी 1 हजार 132 विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 हजार 117 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1 हजार 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 93.46 टक्के निकाल लागला आहे. आय.टी.आय शाखेसाठी 401 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 371 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 92.51 टक्के निकाल लागला आहे.

पून:प्रविष्ठमध्ये सातार्‍याचा 50.32 टक्के निकाल
पून:प्रविष्ठसाठी सातारा जिल्ह्यातून 764 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 763 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 384 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 50.32 टक्के निकाल लागला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy