सातारा : आर्थिक फायद्याच्या अमिषाने दोनजणांनी एका महिलेस सुमारे 15 लाखांना गंडा घातल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन त्याद्वारे शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचा फायदा सांगून तब्बल 15 लाख 71 हजार 120 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सौ.मनाली मल्हार पालकर (वय 35, रा. सदाशिव पेठ, सातारा) यांनी क्रिशन दलबिर, सुभाष बहादुरसिंग या दोघांविरुध्द तक्रार दिली आहे. फसवणूकीची घटना जुलै महिन्यात घडली आहे.
