Explore

Search

September 27, 2025 4:57 am

लेटेस्ट न्यूज़

नागपुर मध्ये दंगल , तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी. !

 नागपुरातील राड्यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. यात पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar) औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली.

सोमवारी (17 मार्च) नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ औरंगजेबाचा पुतळा जाळला. त्यांच्या मते, औरंगजेब एक अत्याचारी शासक होता आणि त्याच्या कबरीचे महिमामंडन थांबवले पाहिजे. यावर मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला.

सायंकाळी 7:00 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक येथे दोन गट आमनेसामने आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू झाला. चिटनिस पार्क आणि भालदारपुरा भागात वाहनांची जाळपोळ झाली, तसेच पोलिसांवरही हल्ले झाले. त्यामध्ये नागपूर  पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy