सातारा : रिसॉर्ट मालकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंकज गणपत बाबर रा. जकातवाडी, ता. जि. सातारा याने निवांत हिल रिसॉर्ट हॉटेल सांबरवाडी येथे त्याच्या नावावर दि. 14 ते 18 फेब्रुवारी एसी रूम बुक केली. यानंतर त्याने हॉटेलच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवल्याचे सांगितले. परंतु तसे काही न करता बाबर हा दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पहाटे हॉटेलमध्ये कोणास काही एक न सांगता व हॉटेलचे 32 हजार 747 रुपये न देता निघून गेला. याचबरोबर बिलाची रक्कम ऑनलाइन पाठवले, असे भासवून हॉटेल मालक चंद्रसेन धनंजय जाधव रा. पोवई नाका सातारा यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याच प्रमाणे बाबर याने मंगेश जाधव यांच्या हॉटेल विठ्ठल मंगलम मध्ये देखील अशाप्रकारे राहून त्यांची देखील 35 हजार 700 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बाबर याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
