Explore

Search

April 20, 2025 3:38 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Nashik News : एचएएलचे सुखोई लढाऊ विमान नाशिकमध्ये कोसळले

नाशिक : एचएएलचे सुखोई लढाऊ विमान सरावादरम्यान अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका द्राक्षबागेच्या शेतामध्ये कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत पायलट बालंबाल बचावले. पायलट अगोदरच विमानातून पॅराशूटद्वारे खाली उतरल्याने किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी पिंपळगाव बसवंत पोलिसांचे पथक व एचएएलचा चमू पोहचला आहे.

एचएएएलचे सुखोई-३०एमकेआय या लढाऊ विमानाचा सरावस सुरू असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पायलटने विमान अतीउंचीवरून खाली आणण्यास सुरूवात केली. विमान एचएएलच्या धावपट्टीच्या दिशेने लॅण्डिंगसाठी नेण्याचा प्रयत्न वैमानिकांकडून केला जात होता; मात्र तत्पुर्वीच विमान निफाड तालुक्यातील शिरसगावातील एका शेतात कोसळले. या दुर्घटनेत संपुर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी आजबाजुच्या पंचक्रोशीमध्ये मोठा आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. शेतामध्ये आग लागल्याने अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. विमान कोसळल्यामुळे वीजताराही तुटून पडल्या होत्या. संपुर्ण शेतात आगीच्या ज्वला व धूराचे लोट उठत होते. विमानात दोन वैमानिक होते, असे आजुबाजुच्या लोकांनी सांगितले. दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखून अगोदरच पॅराशुटच्या सहाय्याने खाली झेप घेतल्याने सुदैवाने ते बचावले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy