Explore

Search

April 19, 2025 10:28 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Jarange Patil News : मनोज जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध

अंतरवाली सराटी :  लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. हे आंदोलन भरकटत चालले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांशी बोलत नाही आहेत, असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागली असल्याने मनोज जरांगे यांना आंदोलन करता आले नाही. ८ जून रोजी उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy