Explore

Search

April 19, 2025 10:30 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : जरा चाललं की थकून जाता?

रोज खा ५ पैकी १ पदार्थ स्टॅमिना वाढेल – हाडंही होतील बळकट

आजकाल थोडे पण काम केल्यावर थकवा जाणवतो (Stamina). थोडं चाललं की किंवा एक जागी बसल्यावरही दम लागतो. असे का होते याचा विचार आपण कधी केला आहे का? पावसाळ्याच्या दिवसात अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं अशा तक्रारी अनेकांच्या असतात (Food). अशा स्थितीत सतत झोपून राहावं वाटतं.

थकवा दूर घालवण्यासाठी काही पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केला तर स्टॅमिना नक्कीच वाढेल. पण स्टॅमिना वाढवण्यासाठी नेमकं कोणते पदार्थ खावे? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल हो ना. आहारात आपण ५ पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे स्टॅमिना वाढेल. शिवाय ताकद आणि उर्जाही वाढेल(Eating for Energy: Superfoods That Naturally Boost Stamina).

स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स

हेल्थ शोट्स या वेबसाईटनुसार, ‘शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. इतर कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांच्या तुलनेत ते हळूहळू पचतील. शिवाय शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जाही मिळेल.’

लापशी :

फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त लापशी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ओट्सचे भरडे पीठाचे आपण लापशी तयार करू शकता. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जाही मिळते.

क्विनोआ :

क्विनोआ हे आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. जे शरीरातील उर्जा वाढवण्यास मदत करते. आपण आपल्या आहारात क्विनोआचा समावेश करू शकता.

प्रोटीन :

स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी प्रथिने आवश्यक आहे. यामुळे शरीरातील उर्जा वाढते. शिवाय चयापचयक्रियाही बुस्ट करते. आपण आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता.

फळे आणि भाज्या :

फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे थकवा दूर करण्यास मदत करतात. शिवाय उर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतात.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy