सोहळ्याला फक्त ५० पाहुणे राहणार उपस्थित
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे हळदी फंक्शन आणि इतर तपशीलही समोर येत आहेत. हळदीच्या कार्यक्रमासाठी केवळ ६० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २० जून रोजी सोनाक्षीच्या वांद्रे येथील घरात हळदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा हळदी सोहळा त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमासाठी केवळ ५० जणांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. पोर्टलने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, “हळदीचा सोहळा सोनाक्षीच्या वांद्रे येथील नवीन घरात होणार आहे. सोनाक्षीने नुकतेच हे घर घेतले आहे जेव्हा ती तिच्या आई-वडिलांपासून वेगळी राहू लागली होती. या कार्यक्रमात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहणार असून यासाठी ५० पेक्षा कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कारणास्तव, सोनाक्षीचे घर हे ठिकाण म्हणून निवडले गेले.
लग्नानंतर भव्य रिसेप्शन
सोनाक्षी आणि जहीरने आधीच ठरवले होते की ते फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे. त्यांना त्याचा आनंद इतर इंडस्ट्रीसह सामायिक करायचा आहे, म्हणून लग्नानंतर स्वागत समारंभ ठेवण्यात येणार आहे.
अशी असणार हळदीची सजावट
सोनाक्षीच्या हळदी समारंभाच्या सजावटीबाबत सांगण्यात आले की, अभिनेत्रीला जास्त फ्रिल्स नको आहेत. तिला वातावरण हलके ठेवायचे आहे आणि तिने हे आधीच तिच्या प्लॅनरला समजावून सांगितले आहे. सोनाक्षीला पिवळी किंवा गुलाबी थीम असलेली हळदी नको आहे, ती काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत आहे. याआधी सोनाक्षीच्या बॅचलरेट पार्टीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या जोडप्याने याबाबत काहीही दुजोरा दिला नसला तरी हनी सिंग आणि पूनम ढिल्लोन यांनी सोनाक्षीच्या लग्नाला दुजोरा दिला होता. त्यात आपण नक्कीच सहभागी होणार असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.
