नवी दिल्ली : निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी नियमितपणे योगाचा सराव करणे आवश्यक आहे. योगाला भारताचा प्राचीन इतिहास लाभला आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाला दिला होतो. त्यानंतर २१ जून हा हिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा घोषित करण्यात आला. लोकांमध्ये योगाचे महत्व आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी नियमित योगा करतात. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते शशांकासन करताना दिसत आहे. शशांकासनचा संस्कृतमध्ये अर्थ ‘ससा’ असा होतो. कारण हे आसन करताना सशासारखी पोझ तयार होते. त्यांनी शशांकासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे सांगितले आहे.
‘शशांकासन’ करण्याची पद्धत
शशांकासन करताना सर्वात आधी वज्रासनात बसावे. नंतर डाव्या हाताने कंबरेच्या मागे उजवे मनगट धरून बसावे. डोळे बंद करा. श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडताना, डोके जमिनीला स्पर्श करेपर्यंत कंबरेपासून पुढे वाकवा. सहज श्वास घेऊन या स्थितीत दीर्घकाळ राहा. श्वास घेताना, सुरुवातीच्या स्थितीकडे परत या.
‘शशांकासन’ करण्याचे फायदे
शशांकासनाचा नियमितपणे सराव केल्यास पोटासंबंधित समस्या असेल तर दूर होतात.
तसेच पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते.
हा योग केल्याने कंबर लवचिक राहते.
हृदयविकार असलेल्या लोकांसाठी हा योग फायदेशीर आहे.
हा योग नियमित केल्याने तणाव दूर होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
नियमितपणे शशांकासनाचा सराव केल्यास पाठ दुखी कमी होते.
पण जास्त वेदना होत असेल कर या आसनाचा सराव करू नका.
उच्च रक्तदाब असल्यास हे आसन करताना काळजी घ्यावी.
तसेच ज्या लोकांना गुडघ्यांमध्ये दुखीची समस्या आहे त्यांनी हे आसन करू नये.
