Explore

Search

April 19, 2025 7:12 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : पावसात भिजल्यानं किंवा आंघोळ करताना पाणी कानात गेल्यास करा 3 उपाय

अनेकदा पावसात भिजताना, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करताना, कानात पाणी जाण्याची शक्यता निर्माण होते. कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. शिवाय कानातून पाणी नाही निघाल्यास, इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो (Cleaning Tips). अनेकदा कानातून आवाजही ऐकू येऊ लागतो. कानात पाणी गेल्यानंतर आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो (Ear care). पण पाणी काही निघत नाही. कान फार नाजूक असतात.

कानातून जर पाणी निघत नसेल तर, हेल्थ शॉट्सला माहिती देताना डॉ. ज्योतिर्मय एस. हेगड यांनी ३ उपाय सांगितले आहेत. त्या म्हणतात, ‘केस धुताना किंवा इतर गोष्टी करताना, कानात पाणी जाण्याची शक्यता वाढते. हे पाणी इअर कॅनलमध्ये जाऊन अडकते. जर आपल्याला हे पाणी काढायचं असेल तर, विशेष पद्धतींच्या मदतीने आपण पाणी काढू शकता'(How to Get Water Out of Your Ears: 3 Easy Tips).

या’ टिप्सच्या मदतीने कानात अडकलेले पाणी काढा

डोकं एका बाजूला झुकवा

गुरुत्वाकर्षण टिल्टच्या मदतीने आपण कानात अडकलेले पाणी काढू शकता. यासाठी ज्या कानात पाणी गेलं आहे, त्या दिशेने आपले डोके वाकवा. नंतर हळू हळू एका पायावर उडी मारा. त्यामुळे पाणी बाहेर काढण्यास मदत होईल. या उपायामुळे इअर कॅनलमधून पाणी निघेल.

यॉनिंग आणि चघळणे

इअर मसल्सला स्टिम्यूलेट करण्यासाठी यॉनिंग किंवा चघळणे फायदेशीर ठरू शकते. या उपायामुळे युस्टाचियन ट्यूब्स उघडण्यास मदत होते. ज्यामुळे इअर कॅनलमधून पाणी निघण्यास मदत मिळते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy