Explore

Search

April 19, 2025 7:12 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे महायुती सरकारचे अभिनंदन

लाडू वाटून केला आनंद साजरा
सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना या आणि अशा प्रकारच्या महिलां च्या समृद्धीसाठी योजना आणून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील सर्व महिला तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सातारा येथील पोवई नाक्यावर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आणि इतर मोर्चा आघाडीच्या सर्व महिलांच्या तर्फे लाडू वाटून महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे एक हजार पाचशे रुपये प्रति महिना महिलांना मिळणार आहे. यामुळे त्यांच्या संसाराला थोडा हातभार लागेल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे जवळजवळ एकावन्न लाख कुटुंबांना वर्षभरात तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना राबवून महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे. मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. या आणि महिलांच्या समृद्धीच्या अनेक योजना राबवून अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून महाराष्ट्र शासनाने महिलांच्या जीवनाचा स्तर उंचावल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्या सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रेणूताई येळगावकर, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिषाताई शहा, सोलापूर येथील प्रदेश सचिव रंजिता चाकोते, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा अध्यक्षा वनिता पवार. बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, जैन प्रकोष्ट महिला अध्यक्षा गीता रणदिवे, जिल्हाचिटणीस कल्पना जाधव, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, जैन प्रकोष्ट महिला उपाध्यक्षा वृषाली दोशी, महिला मोर्चा सातारा शहर अध्यक्षा रीना भणगे, बेटी बचाओ बेटी पढाओ सातारा शहर अध्यक्षा सुचारीता कंडारकर, सातारा शहर उपाध्यक्षा चित्रा माने, चिटणीस कीर्ती पोळ, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा संगीता जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्षा रोहिणी क्षीरसागर, अनु जाती मोर्चा महिला सातारा अधक्षा अंजली त्रिंबके, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा उपाध्यक्षा जयश्री पाटुकले, नंदा इंगवले आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy