Explore

Search

April 12, 2025 10:32 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Ajit Pawar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अजित पवारांची विधानसभेत माहिती

मुंबई : आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. यामध्ये ठाण्याचे आमदार संजय केळकर, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, वांद्रयाचे भाजपा आमदार आशिष शेलार सहभागी झाले होते. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलीं. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत याची माहिती द्यावी, असं संजय केळकर म्हणाले. “शासन मान्यता अनुदान प्राप्त ज्या संस्था आहेत, त्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं. त्यास अनुदानित संस्था असं संबोधलं जातं, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. संघटना सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संघटनांनी अपील केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात जो निकाल लागेल, तो याचिकाकर्त्यांना ऐकावा लागेल आणि सरकारलाही ऐकावा लागेल” असं अजित पवार म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “अनुदानीतचा एक वेगळा विषय असू शकतो. 1 नोव्हेंबरपूर्वी जाहीरात निघालेल्या, शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पार्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे. जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अमलबजावणी कधी करणार?” त्यावर अजित पवार म्हणाले की, “रिटायर झाल्यानंतर ते सुरु होणार. बॅच 2030 ला रिटायर होणार आहे. नागपूर अधिवेशनात चर्चा झाली. पेन्शन देता येत नसेल, तर दहा टक्के कर्मचाऱ्यांनी भरायचे आणि 14 टक्के सरकार भरेल असा निर्णय झाला. याला कर्मचारी संघटनांनी मान्यता दिली आणि सरकारने मान्यता दिली”

“आता प्रश्न राहिला आहे, तो जिल्हा परिषदांचा. त्यांचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे आलेला आहे. जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा सरकारचा भाग आहे, त्यामुळे तो निर्णय देखील घेण्याचा विचार आहे. यामुळे किती भार पडेल याची माहिती घेतली आहे आणि फाईल देखील मागवली आहे. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानभूती पूर्ण निर्णय देऊ” असं अजित पवार म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, जुन्या पद्धतीने पेन्शन द्यावी अशी मागणी होत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, “जेव्हा निर्णय झाला होता, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. आम्ही घेतलेल्या निर्णयाची केंद्र सरकारने माहिती घेतली. सरकार या बाबत सकारात्मक आहे. तीन लोकांची कमिटी नेमली होती” “महायुतीचे सरकार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे” असं अजित पवार म्हणाले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy