Explore

Search

April 19, 2025 6:09 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : रुग्ण व दवाखाने साताऱ्यात ,,मात्र  व्यावसायिक दुसरेच…..

सातारा : वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती झालेली आहे. पूर्वीसारखे आता विविध रुग्णांवर उपचार करण्यास विलंब लागत नाही तर  अवघड शस्त्रक्रिया सुद्धा सोप्या पद्धतीने पार पडल्या जातात. एवढेच नव्हे तर अवयव दान करून सुद्धा शस्त्रक्रिया होऊ शकते. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. याचाच फायदा घेऊन सातारा जिल्ह्यातील दवाखाने  व रुग्ण  घेऊन काही मोठ्या शहरातील वैद्यकीय व्यवसाय धंदा करीत आहेत. अशी टीका रुग्णांचे नातेवाईक करू लागलेले आहेत.

याबाबत माहिती अशी की, मोठ्या प्रमाणात साथीचे रोग व आजारपण यामुळे सातारा जिल्ह्यातील रुग्णू म्हणून कच्चा माल मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी सामाजिक सेवा व आर्थिक लाभ मिळावा यासाठी आता नामांकित शहरातील संस्था व कंपन्या ग्रामीण भागामध्ये शिरकाव करू लागलेले आहेत. हृदय व किडनी शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण केले जात असल्याचे सांगून गरीब व मरणाच्या भीतीपोटी अनेक जण अशा शस्त्रक्रियेला तयार केले जातात. असे रुग्ण नव्हे तर ग्राहकांना शोधण्यासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करण्यात येते. काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक बँक, पतसंस्थेचे कर्ज काढून तसेच शेती गहाण ठेवून अशा अवघड शस्त्रक्रिया व प्रत्यारोपणला तयार होतात.  अपघात, अचानक मरण पावलेले  व्यक्तीचे अवयव दान करताना एखाद्या अवयवाची प्रक्रिया  प्राप्त केली जाते. परंतु नेमकं इतर अवयव सुद्धा घेतात का नाही? याबाबतही शंका घेतली जात आहे. ही बाब सुद्धा समाजामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहे. त्यामुळे असे अवयव काढताना त्याचे चित्रीकरण करून  संबंधितांची मृत्यूदेह नातेवाईकाच्या ताब्यात देणे गरजेचे आहे..

साताऱ्यातील गुणवंत व दर्जेदार वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित काही डॉक्टरांबाबत गैरसमज पसरवला जात आहे. वास्तविक पाहता सातारसारख्या ठिकाणी सेलिब्रिटी असलेले कविवर्य नारायणसुर्वे तसेच सिनेअभिनेत्री आशालता वाबगावकर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले होते. ही वस्तुस्थिती सर्व सातारकरांना माहिती आहे.

साताऱ्यातील वैद्यकीय क्षेत्रात  मोठा बदल झाला आहे . स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अनेकदा गरीब रुग्णांचे शुल्क कमी करण्यास सुद्धा यश आलेले आहे. या व्यतिरिक्त पुणे-मुंबईतून येणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना शुल्क आकारणी मध्ये कोणती सवलत संबंधित दवाखान्यात देत नाहीत. याचाही अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या काही बातम्यांवर विश्वास न ठेवता आपल्या सातारा जिल्ह्यातील अनेक नामांकित वैद्यकीय व्यावसायिकांचा सल्ला घेऊनच हृदय  शस्त्रक्रिया उपचार, आयुर्वेदिक उपचार, गुडघेदुखी, पोटाचे विकार, स्त्री पुरुष विविध विकार, मूत्र विकार, जुनाट सर्दी, मणक्याचे विकार अशा शरीरातील प्रत्येक अवयवाचे उपचार सातारा येथे सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व ज्यांना तातडीने उपचार हवे आहेत. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कोणत्याही नामांकित वैद्यकीय व्यवसायिकांशी संपर्क साधून योग्य व गुणवंत धारक उपचार घेण्यासाठी मानसिकता तयार ठेवावी. असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

सध्या आजाराचे प्रमाण म्हणजे वारंवार सर्दी, ताप, अंगदुखी, डोके दुखी, छातीतील धडधड कमी होणे असे किरकोळ आजार असतात. त्यासाठी इतर शहराततील वैद्यकीय व्यवसायिकांशी संपर्क साधण्यांमध्ये आर्थिक फटकाही बसू शकतो. फसवणूक सुद्धा होऊ शकते. याची कल्पना रुग्णांना आलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून ””’आपली माती आपली माणसं”” या धर्तीवर आपलं आरोग्य”” आपला डॉक्टर” ही संकल्पना साताऱ्यात वाढवण्यात यश आल्याचे अनेकांनी सांगितले. दरम्यान, रुग्णावर होत असलेली अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया काही विश्वासार्ह रुग्णालयातूनच करण्यात यावी. याचबरोबर लोक अवयव दान करत आहेत. त्यांनी अवयव दानाची ही प्रक्रिया ही अतिशय योग्य असलेल्या रुग्णालयांमध्येच करण्याचा निर्णय घ्यावा. जेणेकरून एखाद्याचे प्राण पण वाचतील आणि त्यातून होणारा काळाबाजार ही रोखता येईल. असा नामांकित  वैद्यकीय व्यवसायातील सल्लागारांनी सल्ला दिलेल्या आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy