Explore

Search

April 19, 2025 6:14 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : …म्हणून मुंबई तुंबली : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : काल रात्री मुंबईत अवघ्या 6 तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे, त्यामुळेच मुंबई तुंबली आहे. हा पाऊस वर्षभरात जितका पाऊस पडतो त्याच्या दहा टक्के पाऊस सहा तासांत कोसळला आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केले आहे. याआधी मुंबईत गेली अनेक वर्षे शिवसेना आणि भाजपाची सत्ता होती. तरीही ज्यावेळी मुंबईत पाणी तुंबायचे तेव्हा राजकारणी लोक सत्ताधारी शिवसेनेवर टीका करायचे.  विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आता सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर ट्वीट केले आहे.

आपल्या एक्स हॅंडलवर अजित पवार म्हणतात की काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10 टक्के आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही ( ग्लोबल वार्मिंग ) हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत असा मॅसेज अजित पवार यांनी पोस्ट केला आहे. या नागरिकांनी तीव्र शब्दात टिका केली आहे. विकास म्हणजे नुसते कॉंक्रीटीकरण नको, चार चाकी वाहनांचा खप वाढण्यासाठी नको तेथेही पुल आणि सागरी सेतू उभारले जात आहेत.कोस्टल रोड करण्यासाठी समुद्र बुजविला जात आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy