Explore

Search

April 19, 2025 6:08 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : रितेश-जिनिलियाच्या अवयवदानाच्या निर्णयाचं ४ वर्षांनी पुन्हा होतंय कौतुक

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (NOTTO) ने या उदात्त कार्याबद्दल दोघांचे आभार मानले आहेत. २०२० च्या सुरुवातीला, रितेश आणि जिनिलियाने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एका व्हिडिओद्वारे अवयव दान करण्याच्या त्यांच्या संकल्पाबद्दल सांगितले होते.

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अवयव दान करण्याच्या त्यांच्या वचनाबद्दल सांगितले होते. या गोष्टीचा ते बराच वेळ विचार करत होते. ‘जीवनाची भेट’ यापेक्षा मोठी कोणतीही भेट असू शकत नाही,’ असे त्यांनी व्हिडीओत म्हटले होते. तर कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘कोणासाठीही ‘जीवनाची भेट’ यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही. जेनेलिया आणि मी आमचे अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की या महान कार्यात सामील व्हा आणि ‘जीवनानंतर जीवन’चा भाग व्हा.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले रितेश-जिनिलिया?

व्हिडिओमध्ये रितेश देशमुख म्हणाला होता की, ‘आज १ जुलै रोजी आम्हाला हे सांगायचे आहे की आम्ही दोघांनी शपथ घेतली आहे. आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.’ त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या जिनिलिया म्हणाली होती की, ‘हो, आम्ही आमचे अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे आणि जीवनदानापेक्षा चांगली भेट नाही.’ त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे चाहत्यांनी खूप कौतुक केले होते.

आता NOTTO यांनी कृतज्ञता व्यक्त केली

आता नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर रितेश आणि जिनिलियाचे आभार मानले आहेत. रितेशचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘बॉलिवुड स्टार कपल रितेश देशमुख आणि जिनिलियाचे आभार, ज्यांनी जुलैमध्ये सुरू असलेल्या अवयवदान महिन्यात आपले अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. त्यांचे हे पाऊल इतरांना या उदात्त कार्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देईल.

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy