सातारा : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जानेवारी ते 6 जुलै 2024 दरम्यान प्रज्ञा ऋषिकेश माने रा. देगाव, ता. सातारा हिचा छळ केल्याप्रकरणी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात पती ऋषिकेश भागवत माने, सासू माधवी भागवत माने, सासरे भागवत गणपत माने, नणंद देवकी भागवत माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव करीत आहेत.
