Explore

Search

April 13, 2025 12:48 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Budget 2024 : निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा केला अर्थसंकल्प सादर

पाहा काय स्वस्त, काय झालं महाग…

 नवी दिल्ली : मोदी 3.0 सरकारचा पहिला सामान्य अर्थसंकल्प  आज (23 जुलै) सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी तो संसदेत सादर केला, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पण या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या स्वस्त झाल्या आहेत. याचा आपण नेमका अंदाज घेऊयात. मोदी सरकारने अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे आणि मुख्यत्वे कॅन्सरवरील औषधे ड्युटी फ्री केली आहेत.

मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करताना सांगितले की, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन करणे हे ऐतिहासिक आहे. देशातील जनतेने सरकारवर विश्वास दाखवला आहे. जागतिक  परिस्थितीचा महागाईवर परिणाम झाला आहे, परंतु भारतातील महागाई नियंत्रणात आहे आणि 4% च्या मर्यादेत आहे.’

निर्मला सीतारामन पुढे असंही म्हणाल्या की, ‘अंतरिम अर्थसंकल्पात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता म्हणजेच शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या सतत चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे आमचा संपूर्ण अर्थसंकल्प देखील मागील घटकांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर आमचा भर आहे, विकसित भारतासाठी ही पहिली प्राथमिकता आहे.’

यावेळी सीतारामन यांनी सरकारच्या 9 प्राधान्यक्रमांची गणना केली. यामध्ये कृषी क्षेत्रासह शहरी विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, कृषी संशोधन, ऊर्जा सुरक्षा, नवोपक्रम, संशोधन आणि वाढ यांचा समावेश आहे.

सोन्या-चांदीच्या दरात होईल घसरण :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच मोबाइल आणि मोबाइल चार्जरसह इतर उपकरणांवरील BCD 15% ने कमी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

याशिवाय सरकारने आता सोने (Gold) आणि चांदीवरील (Silver) कस्टम ड्युटी 6 टक्के केली आहे. यानंतर सोन्या-चांदीच्या किमती खाली येतील. याशिवाय चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. दुसरीकडे, टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत. त्यावरील कस्टम ड्युटी 15% करण्यात आली आहे.

काय स्वस्त :
  1. सोने आणि चांदी
  2. आयात केलेले दागिने
  3. प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीमध्ये घट
  4. कर्करोगाची औषधे
  5. मोबाइल चार्जर
  6. माशांचे खाद्य
  7. चामड्याच्या वस्तू
  8. रासायनिक पेट्रोकेमिकल
  9. पीव्हीसी फ्लेक्स बॅनर
काय महाग :
  1. टेलिकॉम उपकरणे
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy