Explore

Search

April 14, 2025 4:28 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : आर्टिस्टिक सिंगल योगासन  प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक

सातारा :  सातारा येथे नुकत्याच  महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीचे के. एस. डी शानभाग विद्यालय आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयाच्या   कु. सुभाषी जगदीश शिंदे या दहावी ब मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने उत्कृष्ट कामगिरी करत 14 ते 18 वयोगटामध्ये आर्टिस्टिक सिंगल योगासन या प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळवला. पुढील महिन्यात  संगमनेर येथे होणाऱ्या  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त योगाचार्य सौ. सुवर्णा सुहास वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग संस्थेच्या संचालिका सौ.आँचल घोरपडे, विश्वस्त सौ.उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभागप्रमुख अभिजीत मगर, पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक शिक्षकांसह, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy