Explore

Search

April 18, 2025 2:36 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime News : वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

वाई : सातारा जिल्ह्यातील वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना अज्ञात चोरटयांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा वाई पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या धर्मपुरी परिसरातील एका दुकानात सुवर्ण कारागिर रविवारी रात्री काम करत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी दुचाकीवरुन दोघे चोरटे आले. त्यांनी या कारागिरांना पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवला. अचानक पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवाल्याने कारागीर भयभीत झाले.

यानंतर सोन्याचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कारागिरांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy