Explore

Search

April 13, 2025 12:15 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bangladesh : गजवा-ए-हिंद, बांग्लादेशात भारताविरुद्ध युद्धाची तयारी

रिपोर्टमधून धक्कादायक सत्य समोर

नवी दिल्ली : बांग्लादेशातील कट्टरपंथीय संघटना जमात-ए-इस्लामी बाबत एक मोठा दावा केला जातोय. ही संघटना अखंड बांग्लादेश बनवण्याच कारस्थान रचत आहे. बांग्ला दैनिक बर्तमानमध्ये 9 ऑगस्टला जमात-ए-इस्लामीच्या या प्लानबद्दल विस्तृत रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. ‘इस्लामिक बांग्लास्तान’ मध्ये बांग्लादेश, पश्चिम बंगाल, बिहार-झारखंडचा काही भाग आणि नेपाल-म्यांमारचा काही भाग सामाविष्ट करण्याचा इरादा आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जमात-ए-इस्लामीला गजवा-ए-हिंद (भारता विरुद्ध युद्ध) उद्देश पूर्ण करायचा आहे. त्यांची नजर बांग्लादेश बॉर्डरच्या जवळ असलेल्या भारताच्या राज्यांवर आहे, असा दावा करण्यात येतोय.

बांग्लादेशात हिंदुविरोधात हिंसाचार आणि शेख हसीना सरकारच्या सत्तापालटामागे ही संघटना असल्याच बोललं जातं. बांग्लादेशात जमात-ए-इस्लामीवर हिंदुविरोधात हिंसाचार केल्याचा आरोप होतो. 1971 साली स्वतंत्र बांग्लादेशच्या निर्मितीला जमात-ए-इस्लामीने विरोध केला होता. ही संघटना आजही पाकिस्तानची समर्थक म्हणून ओळखली जाते. म्हणूनच या संघटनेला ISI चा हस्तक म्हटलं जातं.

ग्रेट बांग्लादेशच्या नावाखाली नकाशे वायरल

बांग्लादेशात शेख हसीना यांच सरकार सत्तेवरुन पायउतार होताच हिंदुंविरोधात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. इस्लामिक बांग्लास्तानचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जमात-ए-इस्लामीने बांग्लादेशातील आरक्षण विरोधी आंदोलन हायजॅक केलं. सोशल मीडियावर ग्रेट बांग्लादेशच्या नावाखाली काही नकाशे वायरल होत आहेत. यात बांग्लादेश-बंगालसह भारताची काही राज्य आहेत.

खूपच संवेदनशील विषय

भाजपा नेते बाबूलाल मरांडी यांनी या वर्तमानपत्राचा रिपोर्ट शेयर करताना कारस्थानाचा संशय व्यक्त केला. “बांग्लादेशातील परिस्थिती आणि कट्टरपंथीयांचे खतरनाक इरादे झारखंडसह संपूर्ण देशासाठी हा खूपच संवेदनशील विषय आहे” असं बाबूलाल मरांडी यांनी म्हटलं आहे.

मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा संसदेत उपस्थित

झारखंडमध्ये ज्या पद्धतीने अचानक बांग्लादेश मुस्लिमांची संख्या वाढू लागली आहे, त्यावरुन असं वाटतय की काँग्रेस आणि JMM सुद्धा कट्टरपंथीयांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी साथ देत आहे असं बाबूलाल मरांडी म्हणाले.  याआधी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंडच्या संथाल परगनामध्ये मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला होता.

भारताच्या विभाजनाआधी स्थापना

भारताच विभाजन होण्याआधी जमात-ए-इस्लामीची स्थापना झाली होती. 1941 साली इस्लामी धर्मशास्त्री मौलाना अबुल अला मौदूदीने यांनी या संघटनेची स्थापना केलेली. भारताच्या विभाजनानंतर जमात-ए-इस्लामी वेगवेगळ्या गटात विभागणी झाली. जमात-ए-इस्लामी बांग्लादेश, जमात-ए-इस्लामी पाकिस्तान सारख्या वेगवेगळ्या संघटना बनल्या.

71 चा मुक्ती संग्राम मानत नाही

बांग्लादेशच्या राजकारणात या संघटनेचा विशेष प्रभाव आहे. ही संघटना 71 चा मुक्ती संग्राम मानत नाही. शेख मुजीबुर्रहमान यांच्यासाठी नायक नाहीत. बांग्लादेशात हिंसाचार सुरु असताना याच संघटनेवर मुजीबुर्रहमान यांची मुर्ती तोडण्याचा आरोप झाला होता. ही संघटना युवकांची माथी भडकवून आपल्या राजकीय महत्वकांक्षांसाठी त्यांचा वापर करते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy