Explore

Search

April 13, 2025 12:16 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Muhammad Yunus : हिंदुवरील हल्ल्यासंदर्भात बांग्लादेशचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे न पटणारे वक्तव्य

नवी दिल्ली : शेजारच्या बांग्लादेशात मागच्या आठवड्यात सत्ता पालट झाला. आरक्षणावरुन उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला नाही. त्यामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागलं. त्यानंतर तिथे राहणाऱ्या हिंदुंवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. हिंदुंची घरं, दुकान जाळण्यात आली. बांग्लादेशात हिंदू समाज अल्पसंख्यांक आहे. बांग्लादेशात हिंदुंवर झालेल्या या हल्ल्याचे भारतातही पडसाद उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लाल किल्ल्यावरुन भाषण करताना बांग्लादेशात हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांची दखल घेतली. काल म्हणजे शुक्रवारी बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन आला होता. मोहम्मद यूनुस यांनी पंतप्रधान मोदींना बांग्लादेशातील सर्व हिंदु, अन्य अल्पसंख्यांकाच्या संरक्षणाच आश्वासन दिलं. बांग्लादेशातील स्थिती नियंत्रणात आणल्याच त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.

बांग्लादेशात जनजीवन सामान्य होत असल्याच ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी एक न पटणारं वक्तव्य केलं. बांग्लादेशात अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हल्ल्याच्या बातम्या वाढवून-चढवून दाखवल्या जात आहेत असा त्यांचा दावा आहे. वास्तविक बांग्लादेशात अनेक हिंदुंची घर, दुकान जाळण्यात आली. त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले, हे वास्तव आहे. बांग्लादेशात शेख हसीना सरकारच्या पतनानंतर 8 ऑगस्टला मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली.

मोहम्मद युनूस यांनी स्वीकारलं भारतीय नेत्याच निमंत्रण

आज थर्ड वॉयस ऑफ ग्लोबल साउथ समिट होणार आहे. या ऑनलाइन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी मोहम्मद युनूस यांनी भारतीय नेत्याच निमंत्रण स्वीकारलं. हिंसाग्रस्त बांग्लादेशमध्ये परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना व्यक्त केली होती. “शेजारच्या देशात हिंदु आणि अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हल्ल्यामुळे 140 कोटी भारतीय चिंतित आहेत” असं ते म्हणाले होते. “भारत शांततेसाठी कटिबद्ध असून बांग्लादेशच्या विकास यात्रेत आम्ही शुभचिंतक आहोत” असं पीएम मोदी म्हणाले होते.

बांग्लादेशातील हिंदू ग्रँड अलायन्सचा दावा काय?

पाच ऑगस्टला शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली सरकारच पतन झालं. त्यानंतर 48 जिल्ह्यात 278 स्थानांवर अल्पसंख्यांक समुदायांवर हल्ले झाले. त्यांना धमक्या देण्यात आल्या. हा हिंदू धर्मावर हल्ला होता असा बांग्लादेशातील हिंदू ग्रँड अलायन्स नावाच्या एका बिगर राजकीय हिंदू संघटनेने दावा केला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy