Explore

Search

April 19, 2025 8:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Maharashtra Band : महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक बदलापूर घटनेचा निषेध

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी शहरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान रेल्वे स्टेशन आणि बदलापूरच्या इतर भागांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये किमान १७ शहर पोलिस कर्मचारी आणि सुमारे आठ रेल्वे पोलिस जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे ट्रॅकवर आंदोलन, तोडफोड आणि पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ६२ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी १५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जागा वाटपाची चर्चा रद्द

महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा होणार होती. पण राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा मांडत जागा वाटपाची चर्चा रद्द करण्यात आली आणि शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यात बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामकाजावर परिणाम दिसू शकतो.

सार्वजनिक दळणवळणावर परिणाम

राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे.

बाजारपेठ राहतील बंद

हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

जालन्यात काँग्रेसकडून बंदची हाक

जालना काँग्रेसच्या उद्याजालना बंदची हाक देण्यात आलीये.. बदनापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेलं हिसांचार प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालये आणि शाळा याठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगिता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.. उद्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली असून व्यापार्यांनी सहकार्य करावं असंही संगिता गोरंट्याल यांनी म्हंटलंय.. दरम्यान बदलापूर प्रकरणात एका महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरल्या प्रकपणा माजी नगराध्यक्षा विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी संगिता गोरंट्याल यांनी केली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy