सातारा : जावली येथील धडाडीचे उद्योजक, जावली पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच लोकशाही वृत्तसंस्थेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांना पंचायत समिती जावली यांच्याकडून पंचायत समिती मार्फत राबवण्यात येणार्या योजनांच्या प्रभावी वार्तांकनासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये वृत्तवाहिनीच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम इम्तियाज मुजावर चोख पद्धतीने करत असतात. शेतकर्यांविषयी व्यथा मांडण्यासाठी शेतकर्यांच्या बाजू मांडण्यासाठी अग्रेसर असणारे धडाकेबाज पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. पत्रकार कसा असावा याचं उदाहरण म्हटलं तर इम्तियाज मुजावर सारखे धडाकेबाज पत्रकार असावेत असे देखील नागरिक म्हणतात. बातमी मागची बातमी शोधून काढण्याचं काम प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने ते सातत्याने करत असतात आणि पाठपुरावा सुद्धा करत असतात. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहणे हा त्यांचा निर्धारच असतो. यासाठी गोरगरिबांना हाकेला धावून जाणारा म्हणजे पत्रकार इम्तियाज मुजावर यांची सातारा जिल्ह्यामध्ये ओळख आहे.
इम्तियाज मुजावर यांच्या सत्काराचा कार्यक्रम उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न होणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सातारा-जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
