सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील सामाजिक कामासाठी प्रसिद्ध असलेले श्री मंगल मारुती मित्र मंडळ यांच्यातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येते.
या उपक्रमा अंतर्गत यावर्षी मंडळ परिसरातील आबासाहेब चिरमुले प्राथमिक शाळा व बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा या शाळातील तसेच अन्य काही विद्यार्थी व विद्यार्थिनींना आवश्यक असणारे सर्व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्याचा सुमारे 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना वर्षभरातील अभ्यासासाठी मदतीचा लाभ होईल. हे साहित्य मिळाल्यावर ते पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अशा या चांगल्या सुनियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बाळासाहेब भाटे यांनी सांगितले की, मुलांनी या मदतीतून मिळालेल्या साहित्यातून भरपूर अभ्यास करावा व स्वतः चे आई वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे व भविष्यात मोठं होऊन अशीच इतर विद्यार्थ्यांना मदत करावी. बापूसाहेब चिपळूणकर शाळेच्या संस्थेचे प्रमुख आनंद गुरव यांनी मंडळाच्या साहित्य वाटप कार्यक्रमातील सातत्या बद्दल गौरवोद्गार काढले. ओंकार बोडस गुरुजी यांनी मुलांना शालेय साहित्यातील कोणतीही कमतरता भासणार नाही व मंडळ वेळोवेळी आवश्यक ती मदत करत असते व यापुढे ही सदैव करत राहील असे सांगितले. मंडळाचे अध्यक्ष उमेश नारकर यांनी मंडळाच्या वर्षभरातील कार्यक्रमांचा आढावा घेतला व या अशा समाज उपयोगी उपक्रमांचे इतर मंडळांनी अनुकरण करावे असे आवाहन केले. नितीन नारकर यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, मंडळाच्या एक वही मोलाची या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्ती नी मदतीचा हात दिला त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमा साठी बापूसाहेब चिपळूणकर शाळेचे मुख्याध्यापक संदीप म्हस्के व आबासाहेब चिरमुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तांबे व त्यांचे शिक्षक सहकारी उपस्थित होते. मंडळ युवा विभागाचे प्रमुख मयूर नारकर व ईशान नातू यांनी या कार्यक्रमा चे सुंदर नियोजन केले.
या कार्यक्रमास सर्वश्री अशोक काळे, स्वप्निल शहा, अतुल आपटे, गुरुप्रसाद पावसकर सार्थ पंडित व मंडळाचे लहानथोर कार्यकर्ते उपस्थित होते.
