Explore

Search

April 8, 2025 12:20 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Webseries : एक सस्पेंस थ्रिलर वेबसीरिज प्रेक्षकांच्या येणार भेटीला 

1000 Babies चा टीझर रिलीज

सध्या मनोरंजन विश्वात विविध विषयांवर आधारीत सिनेमे, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही महिन्यापांसून रिलीज झालेल्या ‘पंचायत ३’, ‘मिर्झापूर ३’, ‘कोटा फॅक्टरी ३’, ‘गुल्लक ४’ अशा वेबसीरिजला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली. नुकतीच सोनी लिव्हवर रिलीज झालेली ‘ब्रिंदा’ ही वेबसीरिजही चांगलीच  गाजली. आता अशीच एक सस्पेंस थ्रिलर वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचं नाव आहे 1000 Babies.

हॉटस्टारवर 1000 Babies चा टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये बघायला मिळतं की, पांढरे केस मोकळे सोडून जीर्ण वस्त्रं परिधान केलेल्या नीना गुप्ता पाहायला मिळतात. काही वेळाने बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकून त्या कानाला हात लावतात. पुढे दिसतं की, एका हॉस्पिटलमध्ये महिला बाळांना जन्माला घेतात. पुढे हॉस्पिटलमधील नर्स बाळांना कडेवर घेऊन रहस्यमयी हालचाली करताना दिसते. शेवटी घडलेल्या घटनांचा शोध घ्यायला पोलीस त्या जंगलात येतात.

नीना गुप्तांचा भयंकर अंदाज

1000 Babies च्या टीझरमध्ये अभिनेत्री नीना गुप्तांचा भयानक अंदाज टीझरमध्ये बघायला मिळतो. अवघ्या ५८ सेकंदाचा हा टीझर पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. सीरिजचा टीझर पाहून कथेचा अंदाज बांधणं कठीण आहे. परंतु यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेलीय हे नक्की. या वेबसीरिजच्या रीलीज डेटचा उलगडा झाला नसला तरीही लवकरच ही सीरिज डिझ्ने + हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy