Explore

Search

April 12, 2025 9:52 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Test Cricket : टीममध्ये 3 वर्षांनी स्टार बॉलरचं कमबॅक

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना हा 5 विकेट्सने जिंकला आहे. त्यामुळे इंग्लंड मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघात दुसरा सामना हा 29 सप्टेंबरपासून लॉर्ड्स येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी सामन्याच्या 48 तासांआधी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली.  इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेब बदल केला.  या दुसऱ्या कसोटीतून स्टार गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने त्या गोलंदाजाची इंग्लंड संघात तब्बल 3 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. ओली स्टोन याचं पुनरागमन झालं आहे. ओली स्टोनला दुखापतग्रस्त मार्क वूड याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. मार्क वूडला पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होती.
स्टोनने संघात स्थान मिळाल्यानंतर वूडच्या वेगाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं. वूडने नुकतंच वेस्ट इंडिज विरुद्ध 156 किमी वेगाने बॉलिंग केली होती. मात्र वूडला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने उर्वरित 2 सामन्यातून बाहेर जावं लागलं. त्यामुळे आता स्टोनसमोर वूडच्या गैरहजेरीत इंग्लंडसाठी शानदार कामगिरी करण्याची संधी आणि आव्हानही आहे. इंग्लंड-श्रीलंका दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. तसेच स्टोनने 2019 साली लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्येच कसोटी पदार्पण केलं होतं. तर स्टोनला 2 वर्षांनंतर 2021 मध्ये दुखारपत झाली. त्यानंतर त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया आणि दुखापतीमुळे स्टोनला 5 वर्षात केवळ 3 सामनेच खेळण्यात यश आलं आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
दुसरा सामना, 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, लॉर्ड्स
तिसरा सामना, 6 ते 10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल, लंडन
दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम : धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, मिलन रथनायके, लहिरु कुमारा, राजेराह कुमारा, सदीरा समरविक्रमा, कसून रजिथा, पथुम निसांका, निसाला थाराका, जेफ्री वेंडरसे आणि रमेश मेंडिस.
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy