Explore

Search

April 19, 2025 7:11 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Raigad News : धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट

तीन कामगार ठार

रायगड : रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनी स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत  मोठा स्पोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर परिसरात याचा आवाज आला. या स्फोटानंतर अग्निशमन यंत्रणा घटना स्थळी दाखल झाली असून बचावाचे काम सुरु आहे.

रायगडच्या धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील केमिकल कंपनीत स्फोट होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. एक किलो मीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. या मोठ्या स्फोटामुळे  धाटाव MIDC परिसरात घबराट पसरली आहे.  अग्नि शमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले आहे. या ठीकाणचा ढीगारा उपसून  बचावाचे काम सुरु झाले आहे. साधन नायट्रो केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.

गेल्यावर्षी झालेल्या स्फोटाच्या आठवणी जाग्या

गेल्यावर्धी  रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी येथे ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागून त्यात सात कामगार ठार झाले होते. या दुर्घटनने या स्फोटाच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. या स्फोटाने महाड एमआयडीसी हादरली होती. हा स्फोट झाला त्यावेळी ५७ कर्मचारी या कंपनीत होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy