Explore

Search

April 13, 2025 12:17 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Apprentice Scheme : सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

सातारा : केंद्र सरकारच्या  महत्वाकांक्षी अप्रेन्टिस योजनेबद्दल उद्योगजगतामध्ये  जनजागृती व्हावी यासाठी  सातारा मेगा फूड पार्क येथे येत्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस  योजना  जनजागृती  कार्यशाळेचे आयोजन करण्यात  आले आहे.

अप्रेन्टिस  योजनेची प्रभावी  अंमलबजावणी व्हावी  यासाठी फूड  इंडस्ट्री  कॅपॅसिटी अँड  स्किल  इनिशिएटिव्ह (फिक्सी) यांच्या  पुढाकाराने आणि यशस्वी  एकेडमी फॉर  स्किल्स  यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन  करण्यात  आले आहे.

या कार्यशाळेत औद्योगिक  आस्थापनांना  अप्रेन्टिस  योजनेच्या अंमलबजावणीमुळे होणारे  लाभ  तसेच  या योजनेमुळे  युवक-युवतींना ऑन द  जॉब  ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम होण्याची मिळणारी  संधी  याबाबत  सविस्तर  मार्गदर्शन करण्यात  येणार  आहे.

केंद्र  सरकारच्या फूड  इंडस्ट्री  कॅपॅसिटी अँड  स्किल इनिशिएटिव्ह (फिक्सी) च्या इंडस्ट्री  एंगेजमेंट व प्लेसमेंट  विभागाच्या  व्यवस्थापिका पुस्पिता राणा, चितळे  डेअरी उद्योग समूहाचे  संचालक गिरीश चितळे, विजयकुमार चोले, उपाध्यक्ष सातारा  मेगा फूड  पार्क   व  यशस्वी एकेडमी  फॉर  स्किल्सचे विभागीय  व्यवस्थापक प्रशांत  कुलकर्णी आदी  मान्यवर  उपस्थितांना अप्रेन्टिस  योजना व  उद्योगजगत याबद्दल सविस्तर  मार्गदर्शन करणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील  औद्योगिक परिसरातील  विविध औद्योगिक  आस्थापनांचे मनुष्यबळ  व्यवस्थापक पदाधिकारी  या कार्यशाळेत  सहभागी  होणार  आहेत, अशी माहिती  यशस्वी  संस्थेचे संचालक राजेश  नागरे  यांनी  दिली आहे.  या कार्यशाळेत सहभागी  होण्यासाठी ९८५०२१४२०२  / ७३५००१४५३६ या क्रमांकावर संपर्क  साधावा असे आवाहन  करण्यात  आले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy