Explore

Search

April 19, 2025 10:25 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे सलग दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडले

छत्रपती संभाजीनगर :  गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानं मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आता तुडुंब भरले आहे. बुधवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाचे महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आले होते. यानंतर गोदापात्रात 9432 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरण 99.78 % ने भरले आहे. जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने 9 सप्टेंबरला एकूण सहा गेट अर्धा फुटाणे उघडले होते. त्याच दिवशी सायंकाळी निसर्गात वाढ करण्यात आली होती व एकूण बारा दरवाजांमधून विसर्ग सुरू होता. 10 सप्टेंबरला पुन्हा सहा गेट उघडण्यात आले व एकूण 18 गेटमधून 9432 क्युसेक विसर्ग गोदापत्रात सुरू होता.

आता अवघ्या पंधरा दिवसांनी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 सप्टेंबरला बंद केलेले हे दरवाजे बुधवारी पहाटे उघडण्यात आले असून या दरवाजातून 94321 गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

गोदाकाडच्या गावांना सतर्कतेचा इशारा :

जायकवाडी प्रशासनाने बुधवारी पाच वाजता 2096 क्यूसेकने विसर्गात वाढ केली होती. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला असून एकूण 11528 क्युसेकने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान जायकवाडीच्या पाण्याने भागते. याशिवाय औष्णिक वीज प्रकल्पाला तसेच शेती सिंचन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे.  बुधवारी आधी सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला. यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

किती भरले जायकवाडी धरण?

जायकवाडी धरण 99.78 टक्क्यांनी भरले असून जायकवाडीत पाण्याची पातळी 1521 फुटांवर गेली आहे. धरणाच्या वरील भागात तसेच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. दरम्यान बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहा दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला होता.

कोणत्या भागांना पावसाचा अलर्ट?

मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  नांदेडमध्ये मध्यम सरींचा अंदाज असून लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

दोन दिवसातील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ

मागील दोन दिवसात झालेल्या पावसानं मराठवाड्यातील धरणपातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मराठवाड्यातील बहुतांश धरणे आता भरण्याच्या मार्गावर असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy