Explore

Search

April 19, 2025 10:27 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : अभियंत्यांना कामाचा अभिमान वाटला पाहिजे : श्रीमती याशनी नागराजन

सातारा :  अभियंता हा आपल्या देशाच्या वीज- पाणी- दळणवळणच्या कामगिरीसाठी जबाबदारीने काम करत असतात. त्या सर्वांचे कौतुक झाले पाहिजे. तसेच त्यांनी केलेल्या सर्वच कामांचा त्यांना स्वतःलाही अभिमानाची गोष्ट वाटली पाहिजे. असे प्रतिपादन सातारा  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी  अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी आदर्श अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श अभियंता पुरस्काराच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. या वेळेला  उत्कृष्ट कामगिरी केलेले अभियंता श्रीकांत कुलकर्णी, अभियंता महेश टंकसाळे, अभियंता समित हरूण शेख, अभियंता रेहना महंमद मुल्ला, अभियंता रेखा प्रदीप कुमार महतो ,अभियंता विद्याधर सुधाकर खांडेकर, अभियंता संग्राम सिंह हराळे, अभियंता अशोक कांबळे यांचा यतोचित सत्कार तसेच त्यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.

श्रीमती नागराजन या स्वतः अभियंता असल्यामुळे त्यांनी आपल्या भाषणांमध्ये मार्गदर्शनाऐवजी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझे वडील सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता होते. त्यावेळी त्यांना सुवर्णपदक मिळाले असताना मी सुद्धा लहानपणी अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्याची त्यांनी आठवण करून दिली. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी तीन महिलांची निवड झाल्यामुळे त्यांनी आपल्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबाबतची माहिती दिली.  सध्या लघुपाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा व बांधकाम विभाग यांच्या कामाचा दर्जा वाढलेला असून तो अधिक वाढावा. अशी शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष आर. वाय. शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अभियंता अरुण कुमार दिलपाक व पुरस्कार प्राप्त अभियंत्यांचे कुटुंब व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषद बांधकाम उत्तर चे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांनी आभार मानले.  प्रारंभी भारत देशातील पहिले अभियंता विश्वेश्वरय्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. अजित चव्हाण यांच्या सुमधुर वाणीने सूत्रसंचालन केल्यामुळे ॥ कार्यक्रमाला चांगलीच शोभा वाढली होती. या कार्यक्रमांमध्ये अनेक महिला व चिमुकल्यांनी श्रीमती नागराजन यांच्या समवेत मनमोकळे गप्पा व  फोटोसेशन केले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy