Explore

Search

April 13, 2025 12:49 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Industrial Organizations : महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख

सातारा जिल्ह्यातील ५ संस्थांचे नामकरण

सातारा :   कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील ५ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती.

याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.”

नामकरण केलेल्या संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे :

१.  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा  (जावळी), जि. सातारा- वीर जीवा महाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा (जावळी), जि. सातारा.

२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड, जि. सातारा  – सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड, जि. सातारा.

३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा, जि. सातारा- समर्थ रामदास स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा, जि. सातारा.

४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध खटाव, जि. सातारा  – लक्ष्मणराव इनामदार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध खटाव, जि. सातारा.

५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाटण, जि. सातारा – वत्सलादेवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाटण, जि. सातारा.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy