डंपरच्या चाकाखाली गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू
पुण्यात भीषण अपघाताटी घटना घडली आहे. कोथरुड परिसरामध्ये हा अपघात झाला आहे. यामध्ये 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डंपरची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे.
पुणे : पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोथरुडमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. कोथरूड धोंडीबा सुतार बस स्थानक येथे भीषण अपघात झाला. यामध्ये युवतीचा मृत्यू झाली माहिती समोर येत आहे.
कोथरुड धोंडीबा सुतार बस स्थानकासमोरची ही घटना घडली. यामध्ये तरुणी रस्ता ओलांडताना तिला डंपरची धडक बसली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरती सुरेश मनवाने (वय 23) रा. एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूड ही कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत होती. रस्ता ओलांडताना तिला डंपरची जोरदार धडक बसली. या धडकीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील सुरेश मनवाणी यांना पोलिसांनी कळवले आहे. तसेच कोथरुड पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.
