Explore

Search

April 19, 2025 10:27 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : जनता बँकेतर्फे विनोद कुलकर्णींचा सत्कार

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदन

सातारा : सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँक लि.,सातारा,चे भागधारक पॅनेलप्रमुख बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी बँकेच्यावतीने पेढे, शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचीत सत्कार केला.

याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना बँकेचे जेष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर त्याचप्रमाणे मसापच्या कोषाध्यक्ष पदी यापूर्वी निवड झाल्यामुळे विनोद कुलकर्णी यांच्या रूपाने सातारा जिल्हयाला मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.

बँकेचे संचालक श्री. बाळासाहेब गोसावी यांनी श्री. कुलकर्णी यांच्या निवडी बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुणे अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी केलेले प्रयत्न सांगत यंदाचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे,  अशी अपेक्षा व्यक्त केली. बँकेचे संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य ॲड. चंद्रकांत बेबले, विनय नागर यांनी श्री. कुलकर्णी यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्कारास उत्तर देताना विनोद कुलकर्णी यांनी मराठी साहित्य परिषदेच्या शाखेची शाखा स्थापना ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्ष निवडीपर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेवून मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनाचा, पत्रव्यवहाराचा, वापरलेल्या डावपेचांचा उल्लेख करून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळावर झालेली निवड हा केवळ माझा बहुमान नाही तर शाहुपूरी शाखेच्या स्थापना ते मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळावा म्हणून माझ्या बरोबर संघर्ष केला त्यासर्वांचा त्याचप्रमाणे सर्व सातारकरांना असल्याचे सांगितले.  मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी केलेला संघर्ष पुस्तकरुपात लवकरच आणणार आहे. यावेळी जनता सहकारी बँक लि., साताराच्या सर्व सहकारी संचालक सदस्यांनी केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी जेष्ठ संचालक जयवंत भोसले, आनंदराव कणसे, अविनाश बाचल, नारायण लोहार, रविंद्र माने, वजीर नदाफ, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, तसेच बँकेचे पदाधिकारी व सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि  सेवक वर्ग उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy