Explore

Search

April 16, 2025 12:27 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : राज ठाकरेंनी भेट नाकारली

सदा सरवणकर इरेला पेटले; म्हणाले, आता लढायचंच…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सदा सरवणकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असताना सदा सरवणकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून यावेळी पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते, मात्र सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. मला यावर आता काहीही बोलायचं नाही, तुम्हाला उभं राहिचं तर राहा. नसेल राहिचं तर राहू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सदा सरवणकर यांनी म्हटलं की, मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे हे भेटायलाच तयार नसल्यानं माझा नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे, असं सरवणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरवणकर यांनी आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. माहीम मतदारसंघातील स्थिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगताना, मी जरी माघार घेतली तरी अमित ठाकरे निवडून येतील अशी परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची देखील इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. त्यामुळे आता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय सरवणकर यांनी घेतला आहे. त्यामुळे माहीममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy