Explore

Search

April 19, 2025 10:25 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : सुप्रिया सुळे यांनी दिला पुरावा

सुनील टिंगरेंनी शरद पवारांना दिलेली नोटीस दाखवली

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. पुणे येथील आमदार सुनील टिंगरे काही म्हणण्यापूर्वी पोर्श प्रकरणामुळे चर्चेत आले होते. आता त्यांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नोटीस पाठवली आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रचारसभेत दिली होती. त्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी याचा नकार दिला होता. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस दाखवली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, सुनील टिंगरे यांनी सांगितले की मी कोणतीही नोटीस पाठवली नाही. यामुळे या नोटीसची कॉपी मी आणली आहे. यामध्ये शरदचंद्र पवार यांचे नाव आहे. त्यांच्या नावानीशी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. त्यात पोर्श कार अपघात प्रकरणात बिनशर्त माफी मागण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

फौजदारी अन् गुन्हेगारी खटला दाखल करणार

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आता आम्ही कशासाठी माफी मागावी. आमदार टिंगरे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस स्टेशनला गेले होते, हे पोलिसांनी मान्य केले आहे. माध्यमांमध्ये त्या बातम्या आल्या आहेत. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले तर आमच्यावर ते फौजदारी आणि गुन्हेगारी खटला दाखल करणार आहे. आम्हाला हा गुन्हा मान्य आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ही नोटीस दिली आहे. ही नोटीस १५ ऑक्टोबर रोजी पाठवली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुनील टिंगरे यांनी काय म्हटले होते…

सुप्रिया सुळे यांच्या आरोपानंतर सुनील टिंगरे यांनी म्हटले होते की, मी कोणतीही नोटीस शरद पवार यांना पाठवली नाही. चुकीची माहिती घेवून आरोप केले जात आहे. नोटीस महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना नोटीस बजावली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy