Explore

Search

April 16, 2025 5:49 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Phaltan News : मानवी साखळीद्वारे फलटण येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

फलटण : विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी  तसेच मतदानाचा  टक्का वाढावा, यासाठी 1 हजार विध्यार्थी, युवक व मतदार यांच्या माध्यमातून  महाराष्ट्राच्या नकाशामध्ये  फलटण 100  % मतदान  रांगोळी च्या व  मानवी साखळी द्वारे करण्यात आले. तसेच  मानवी साखळी द्वारे जनजागृती चा कार्यक्रम संपन्न झाला.

फलटण येथील यशवंतराव चव्हाण क्रीडा मैदानात झालेल्या कार्यक्रमास नोडल अधिकारी जिल्हा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे,  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मतदार व विद्यार्थ्यांची संवाद मुख्याधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, घरी आपल्या आई-बाबांना तसेच आपल्या परिसरात असणाऱ्या मतदार यांना मतदान हक्क बजावण्याबाब अहवान करून  येत्या  20 नोव्हेंबर 2024 रोजी घरा बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम सुरु असल्याचे सांगून मतदार यांनी जागरूक होवून मतदान करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि सुरुवात होऊन मतदान मतदान जनजागृती चे पथनाट्य सादर करण्यात आले, व मतदार राजा जागा हो या लोकगीतातून गीत सादर करण्यात आले. तसेच उपस्थितांना मतदान करण्याचे शपथ  देण्यात आली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy