Explore

Search

April 19, 2025 10:19 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : जिल्हा बँकेचे नितीन पाटील उत्कृष्ट चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे ‘उत्कृष्ट  मुख्य कार्यकारी अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित

सातारा : देशातील नामवंत अशा Eventalist conference, E- plus, KPMG, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ यांचे वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सर्वोत्कृष्ट चेअरमन आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” तसेच जिल्हा बँकेस उत्कृष्ट जिल्हा मध्यावरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित करणेत आले. सदर पुरस्कार गोवा येथे भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) चे अध्यक्ष दिलीप संघवी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रमोद कर्नाड, तेलंगणा राज्य सहकारी बँकेचे माजी अधिकारी श्रीनिवास राव यांचे शुभ हस्ते बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ,  सुनील खत्री, रामराव लेंभे, लहुराज जाधव यांनी स्वीकारला.

बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील अभ्यासू आहेत. संपूर्ण बँकिंग व्यवसाय हा बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार केला जातो. सातारा जिल्हा बँकेने गेल्या सात दशकामध्ये संचालक मंडळाच्या अभ्यासपूर्वक दूरदृष्टीच्या ध्येय धोरणांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शुन्य टक्के निव्वळ एन .पी .ए, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे आय .एस .ओ .९००१-२०१५  मिळालेले मानांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी तसेच राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच खुप कमी वेळात आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंगच्या सुविधा देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केलेला आहे. नुकतेच बँकेस सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक्स या संस्थेतर्फे “सर्वोत्कृष्ट बँक” म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मान. ना. श्री. अमित शहा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मा. श्री. कृष्ण पाल यांच्या शुभहस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बँकेस देऊन सन्मानित केलेले आहे. जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांचे बँक आणि संचालक मंडळावरील धृढ विश्वास आणि त्यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे. या सर्वंकष कामाची नोंद घेऊनच बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना “उत्कृष्ट अध्यक्ष” या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी तीस देशांचा शेतीविषयक अभ्यास दौरा केला असून शेतीविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. कृषी, सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल विविध नामवंत संस्थांनी त्यांना वीस पेक्षाही जास्त पुरस्काराने सन्मानित केले आहे. बँकिंग फ्रंटायर्स मुंबई, कर्नाडस् बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, कोल्हापूर तसेच राज्य बँक असोसिएशन मुंबई यांचेवतीने डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ‘उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून त्यांच्या सर्वंकष बाबींची नोंद घेवून विविध संस्थांनी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. कृषी आणि बँकिंग विकासासाठी डॉ. सरकाळे यांनी बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून सर्वसामान्य शेतकऱ्याना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे व कृषीच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनात अमुलाग्र बदल घडवून कृषी क्रांती केलेली आहे. तसेच आपल्या विविध पुस्तकातून पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड कशी द्यावी, कृषी उत्पादन ते निर्यातीपर्यंत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेमध्ये विविध उपक्रम राबवून, आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे.

सदर पुरस्कार मिळालेबद्दल बँकेचे संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, मा. श्रीमंत उदयनराजे भोसले, जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, सर्व संचालक मंडळ, तसेच बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, बँकेचे अधिकारी व सेवक, गटसचिव, सहकार क्षेत्रातील आजी-माजी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy