Explore

Search

April 13, 2025 12:14 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune News : पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे दुख:द निधन

पुणे : पुण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. डॉ. किरण ठाकूर हे पुणे पत्रकार श्रमिक संघाचे माजी अध्यक्ष होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभगाचे माजी विभागप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.  पत्रकार प्रतिष्ठानच्या स्थापनेत आणि पत्रकार भवनाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

सन 2001 ते 2007 या कालावधीत त्यांनी विद्यापीठात संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभगाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी जवळपास 30 वर्षांपेक्षा जास्त काळ  पत्रकारिता केली. दरम्यान अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या आठवड्यापासून डॉ. किरण ठाकूर हे आजारी होते असे समजते आहे. एमआयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक नचिकेत ठाकूर व दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांचे निर्माते पार्थ हे त्यांचे पुत्र होत.

दरम्यान त्यांना उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. डॉ. किरण ठाकूर यांनी पुणे डेली आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधि म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले आहे. 2001 मध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुए विद्यापीठाच्या ज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभगात त्यांनी प्राध्यापाक म्हणून काम सुरू केले. 2001 ते 2007 या कालावधीत त्यांनी या विभगाच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवले. डॉ. किरण ठाकूर यांनी वृत्तपत्राच्या वेब आवृत्या या विषयावर पीएचडी केली होती. तसेच त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन देखील केले आहे. भारतीय विद्याभवनच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामही त्यांनी काही काळ केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथील मुद्रा इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च तसेच फ्लेम, विश्वकर्मा विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले.

ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त व कार्यवाह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. किरण ठाकुर (वय -७७) यांचे आज निधन झाले. पत्रकार प्रतिष्ठानच्या स्थापनेत आणि पत्रकार भवनाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy