Explore

Search

April 5, 2025 12:57 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

मंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं पडद्यामागून सक्रिय? एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर निघाले, धसांनंतर आता संदीप क्षीरसागर अडचणीत

 बीडमधून मारहाणीचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. 

सातारा प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या (Santosh Deshmukh Death Case) घटनेनंतर बीडचे नाव हे केवळ राज्यात नव्हे तर देशाभरात गाजलं. सरपंच देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानुष हत्येचे फोटो पाहून राज्यांमध्ये एकच उद्रेक झाला होता. या उद्रेकानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा गेल्या दोन महिन्यापासून जो चर्चेत होता, तो सुद्धा झाला. या सर्व घटनानंतर आता बीड जिल्ह्यातून एका-पाठोपाठ एका प्रकरणं बाहेर येऊ लागले आहे.

अशातच, बीडमधून मारहाणीचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. या मारहाणीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. बीडमधील या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहे. त्यामुळे बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर निघत असल्याने मंत्रिपद जाताच धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय तर नाही ना? अशी चर्चाही रंगू लागली आहे.

एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ? चर्चेला उधाण
पुढे आलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2024चा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. यात जयमल्हार बागल यांनी ही मारहाण केल्याचं ही बोलले जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याची थेट ईडीकडे तक्रार करणार असल्याचे बोललं जात असताना. सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईचे प्रकरण बाहेर आलं असून त्याचे अनेक नवनवीन कारनामे पुढे आले आहे.

त्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा व्हिडिओ पुढे आला आहे. मात्र 12 डिसेंबर 2024चा हा कथित व्हिडिओ आताच नेमका कसा व्हायरल झाला? यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. परिणामी या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते आणि नवी कोणती माहिती पुढे येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy