Explore

Search

April 12, 2025 6:59 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

काल बारामतीत बैठक, आज सांगलीत जाहीर सभा; पुन्हा राजकीय भूकंप होणार का ?

सांगलीमध्ये आज जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ते अजित पवार गटात जाणार असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माझं काही खरं नाही, असे मोठे विधानही केले होते. त्यानंतर आज सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी जाहीर सभेचे आयोजन केले असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. जयंत पाटलांकडून वारंवार या गोष्टी नाकारण्यात आल्या आहेत.पण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाला आहे. शिवाय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व शशिकांत शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र पक्ष निरीक्षक निवड झाल्यामुळे संलग्न या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आज जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे.

कालच जयंत पाटील बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज मेळाव्याचे आयोजन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या मेळाव्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेमकी काय भूमिका मांडणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy