कुणाल कामराने केवळ एकच गाणं म्हटलं नाही, तर त्याने देशातील विविध प्रश्नावर अशी सहा गाणी म्हटली आहेत. एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं म्हटलं आहे !
मुंबई येथील स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा कडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गाण केल आहे . हे गाण व्हायरल होताच , शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्त्यांनी खार मधील स्टुडीओ ची तोडफोड केली आहे . हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल व कुणाल सरमळकर यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे चार वाजता पोलिसांनी राहुल कनाल यांना ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत राहुल कनालसह सुमारे 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरावर शिवसेना शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी BNS च्या कलम 353(1)(b), 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या गाण्यावर शिंदेची शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येते , तर ठाकरेंच्या सेने कडून कौतुक केल्याचे सांगितले जातंय ! याच बरोबर सकाळी ११ वाजता कामरा ची धुलाई करणार असे संजय निरुपम यांची पोस्ट व्हायरल होत आहे . कामरा ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी शिंदे शिवसैनिकां कडून कडून मागणी होत आहे .
