गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले, मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला !
सातारा प्रतिनिधी : साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील योगेश पवार व त्याची प्रेयसी रोशनी माने यांचे खूप दिवसापासून प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधातून योगेश ने आपल्या प्रेयसी ला म्हणजेच रोशनीला लाखो रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे. काही काही काळानंतर योगेश ने आपले पैसे परत मिळावे ह्या उद्देशाने रोशनी कडे मागितले असता रोशनी त्याला १८ मार्च रोजी नरवणे येथे बोलावाले , व तिची आई व त्यांच्या साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने खून केल्याचे उघड आले. खून केल्यानंतर योगेश चा मृतदेह स्विफ्ट कार मध्ये टाकून फडतरी येथील केनोल मध्ये फेकला . योगेश च्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणाचा छडा लागल्याचे समजले .रोशनी , तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे .
