राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, देवेंद्र फडणवीसांनी मांडला प्रस्ताव
प्रतिनिधी ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी अनुमोदन दिले आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
