बुधवार नाका परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी…!
सातारा प्रतिनिधी : रमजानच्या पवित्र महिन्यात महिनाभर कडक उपवास करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त थंडगार पाणी व ज्यूस वाटप केले. सातारा बुधवार नाका येथील कब्रस्तानात ईदगाह मैदानावर हजारो लोक नमाज पठण करण्यासाठी येत असतात. या आलेल्या सर्व बांधवांना दरवर्षी प्रमाने यंदाच्या वर्षी पाणी आणि ज्यूस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांना माजी उपनगराध्यक्ष श्री. जयेंद्र दादा चव्हाण, माजी नगर सेवक शकील भाई बागवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमा वेळी पेठेतील युवक मोहसीन शेख, नवाज शेख , शाहिद सय्यद , अतीक शेख, कुणाल भंडारे , परवेज शेख, आरिफ शेख, सिद्धीक बागवान, अनिकेतभैया गायकवाड, रियाज भाई बागवान, गुलाब मतकर, सुनील लिमकर, मोईन बागवान आदि मान्यवर उपस्थित होते. या सर्व युवकांनी अथक परिश्रम घेतले तसेच शाहूपुरी पोलिसांनी ही वाहतूक नियंत्रण करून मुस्लीम बांधवांना सहकार्य केले व रमजान ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या..
