Explore

Search

April 5, 2025 12:58 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी , वाढत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा !

सातारा प्रतिनिधी : एप्रिल महिन्याची सुरूवात होताच जिल्ह्यात वळवाचे आगमन झाले असून मध्यरात्रीच्या सुमारास कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तासभर पावसाने हजेरी लावली.. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. तर सातारा शहरातही हायवे लगत  काल रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला.

जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली. सुरूवातीला ३५ ते ३६ अंशाच्या घरात असणारे कमाल तापमान नंतर वाढत गेले. त्यामुळे मार्चच्या मध्यावरच पूर्व माण, खटाव आणि फलटण तालुक्यात ४० अंशाचा टप्पा पार केला होता. तर सातारा शहरातील कमाल तापमान ३९ अंशावर गेले होते. यामुळे दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री उकाड्याचा सामना करावा लागत होता. याचा शेतीची कामे तसेच बाजारपेठेवरही परिणाम झाला होता.

गेल्या तीन दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला होता. दुपारच्या सुमारास तर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अधूनमधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होत होता. हा अंदाज आता खरा ठरला आहे. काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कऱ्हाडसह मलकापूर परिसरात वळीव पडला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy