Explore

Search

April 7, 2025 1:36 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवण्याचे वनखात्याचे आदेश !

Mumbai news live updates: Maharashtra special cabinet meeting

सातारा प्रतिनिधी ;सातारा जिल्ह्यातील मुनावळे इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचे (Water Tourism Project) काम सुरु होते. मात्र, हे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 16 परवानग्या मिळाल्या नसल्याने सुशांत मोरे यांनी याबाबत आंदोलन केलं होतं. मुनावळे येथील उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम सुरु करता येणार नाही असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.

मागील वर्षी  मार्चमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे काम सुरू केले. मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकोसिन्सिव्ह झोन म्हणून जाहीर केला या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक  सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या 16 ना-हरकत परवानग्या मिळवणे गरजेचे असताना सद्य:स्थितीत कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे न हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नये असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत……

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy