Explore

Search

April 19, 2026 10:57 pm

लेटेस्ट न्यूज़

Murder in Phaltan taluka : फलटण तालुक्यात सख्ख्या बहीण-भावाचा खून

फलटण : फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. सिकाबाई शिंदे (वय ३२) व सुमित शिंदे (१५) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हा खून कोणी व का केला याचा पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंचनामा करण्याची कारवाई करीत आहेत. दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पंचनामा करीत आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy