Explore

Search

September 27, 2025 4:57 am

लेटेस्ट न्यूज़

‘मुलासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली’,

 जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी, पनवेलमधील दिलीप देसले, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे.

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.

डोंबिवलीचे कौस्तुभ लेले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला. कौस्तुभ लेले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या हल्ल्यात त्यांचा भाऊ संजय लेले आणि बालमित्र हेमंत जोशी यांचा हकनाक बळी गेला. माझ्या पुतण्यासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. व्यक्त करावा तेवढा संताप कमी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy