Explore

Search

April 19, 2026 11:25 pm

लेटेस्ट न्यूज़

Nagpur News : स्फोटकं बनवणाऱ्या चारमुंडी कंपनीत स्फोट

तीन कामगारांचा मृत्यू, सात जण जखमी

नागपूर :  जिल्ह्यात एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये स्फोट झालाय. यात सात जण जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे.

माहितीनुसार, तीन कामगार मृत्युमुखी पडले आहेत. सातजण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागपूर जिल्ह्यातील ठामणा येथे चारमुंडी नावाची स्फोटकं बनवणारी कंपनी आहे. याठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचे प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कोणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये. स्फोटकं आतमध्ये असल्याने याची खबरदारी घेतली जात आहे. स्फोट कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण, कंपनीमध्ये सात ते आठ जण काम करत होते अशी माहिती आहे. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी गर्दी केली आहे. आमदार अनिल देशमुख याठिकाणी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy