सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा 25 वर्धापन दिन नुकताच सातारा येथे पार पडला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दलाच्या वतीने दहा हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
वर्धापनदिनाचे औचित्य साधत सातारा लिंब गोवे येथील कोटेश्वर हायस्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन लोककल्याण कार्य राज्यनिर्मितीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दलाने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दल हे आपल्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लांवंघरे यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवादलाच्या प्रदेश, तालुका, शहर, जिल्हा पदाधिकार्यांनी असे कार्यक्रम राबवावेत, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
सातारा येथे तिर्थक्षेत्र श्री कोटेश्वर विद्यालय, गोवे ता. जि. सातारा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अमितदादा कदम, सेवादल प्रदेशाधक्ष राजेंद्र लावंघरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम म्हणाले, सातारा जिल्हा हा प्रथमपासूनच आपल्या पक्षाचा बालेकिल्ला ठरला आहे. आता यापुढेही पक्षाच्या हिताच्यादृष्टीने आपण आपली वाटचाल जोमाने सुरु ठेवली पाहिजे. या अनुषंगाने अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्यास नेहमीच सहकार्य राहिले आहे आणि ते नेहमीच राहील.
यावेळी सेवादलाचे प्रदिपराव शिंदे प्रदेश उपाध्यक्ष, राजेन्द्र बुलुंगे प्रदेश संघटक, अरूण माने जिल्हा प्रशिक्षण, रामराव पिसाळ सातारा जिल्हा उपाध्यक्ष, मयुर जाधव, सातारा शहर अध्यक्ष, भुजंगराव जाधव माजी सरव्यवस्थापक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, अनिल मापारी युवा कार्यकर्ते, प्रदेश सेवादल सचिव तुषार सोनमळे, लिंबचे संजय सोनमळे, शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक सौ. विभा साबळे तसेच विद्यार्थी, पालक, नागरिक यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन सदाशिवराव बागल यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्राचार्य किसन बल्लाळ यांनी मानले.
Author: rayatdarpan
news



